संपादकीय

कडवटपणा नको

कडू यांनी जे शक्तिप्रदर्शन के ले, त्यात त्यांनी पाच मागण्या सरकारकडे के ल्या आहेत. यातील बहुतेक मागण्या शेतकऱ्यांच्या सं दर्भातल्या आहेत. खरोखर शेतकऱ्यांच्या संदर्भात बच्चू कडूंनी काम करावे. राजकारण हे दुय्यम ठेवावे. विनाकारण ओरडाआरडा के ला, तर तुम्हाला वाटतात ते गैरसमज समजात बदलतील, एवढे पुन्हा लक्षात ठेवावे.

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद एका उंचीपर्यंत गेला आणि नंतर तो अंदाज होता त्याप्रमाणे संपुष्टात आला. खोकी आणि डोकी या दोन्ही बाबी राजकारणात महत्त्वाच्या असतात. विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीनंतर हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. एक एक मत किती महत्त्वाचे असते आणि ते मिळवण्यासाठी घेतलेले परिश्रम किती अर्थपूर्ण असतात, हे जाहीर झाले आहे. या वाहत्या गं गेत अनेक घोडी न्हाऊन निघाली. सुमारे चाळीस जणांनी या गंगेत स्नान केले. शुचिर्भूत झाले. स्वतंत्रपणे देवत्व त्यांनी प्राप्त करून घेतले. ज्या गंगेत आपण पवित्र झालो, ज्या परिस्थितीत पवित्र झालो, त्याची आठवण या मंडळीना राहिलेली नाही. सोबत राहिले, सोबत पवित्र झाले आणि आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे कितपत रास्त आहे? पण राजकारणाची झापडे एकदा का बुद्धीवर लावली, की सारासार विवेक राहत नाही. विचार राहत नाही.

आता बच्चू कडू आणि रवी राणा यांची सध्याची अवस्था सर्व देव नमस्कारम् केशवम् प्रतिगच्छती यासारखी आहे. म्हणजे अपक्ष असो वा कोणती सं घटना, शेवटी भारतीय जनता पक्षाच्या पायाशी शरणागत व्हायचे असेल तर विनाकारण भांडणाचे मुद्दे का काढावेत? त्यावर शक्तिप्रदर्शन करून आपले महत्त्वका वाढवावे? मंत्रिपद मिळाले नाही; ते मिळावे यासाठी स्वाभिमानाचा बुरखा पांघरून लाचारीला शाैर्याचा मुखवटा का लावला हे समजत नाही. आमचे दहा आमदार यापुढे निवडून येतील आणि त्या वेळी आमचे सरकारने ऐकलेच पाहिजे असे उन्मत्त विचार जाहीर सभांमध्ये तरी का आणि कशाच्या जोरावर काढावेत? खरे तर आपली ताकत किती, आपण काय करू शकतो, याचा विचार एकट्या-दुकट्या मंडळीनी केला पाहिजे. जो पक्ष सत्तेत येईल त्याच्याशी जुळवून घ्यायचे, जमेल तेवढे आपले महत्त्व वाढवून घ्यायचे आणि आपला वरचष्मा कसा राहील हे पाहायचे एवढाच एकमेव उद्देश या मंडळीचा असतो.

आपण शेतकरी आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण केवळ आपल्यालाच आहे आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आपले वैयक्तिक नोकर असल्यासारखे वागायचे हा मानभावीपणा आहे. शेतकरी असणे आणि त्याचा विनाकारण फायदा घेणे हा ट्रेंड होतो आहे. आमदार कडू यांनी हा ट्रेंड अधिक व्यापक आणि ठसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. झालेले सत्तांतर खरोखर कसे झाले याबद्दल लोकांमध्ये काही धारणा आहेत. सत्तांतर मनाने, पैशाने किंवा दहशतीने होते. आता मनाने हे सत्तांतर झाले असे म्हणणे म्हणजे वेड्याच्या नंदनवनात राहणे होय. एका वेळी चाळीस जणांना गुवाहाटीला जावे वाटणे, नेमके निवडणुकीचे टायमिग साधणे ही सगळी अत्यंत निर्मळ मनाची कृ ती वाटत नाही; तर पन्नास खोके हा नारा जरी विरोधी राजकीय पक्षाने दिला असला, तरी त्यात शंका घ्यावे, असे वातावरण नक्कीच आहे. आणि हे वातावरण बदलणे, त्यात बदल करून दाखवणे आवश्यक आहे. असे न झाल्यास पन्नास खोके हा शिक्का कायम राहणार आहे.

सत्तांतर बळाच्या मुद्द्यावर झाले असावे, असा एक आरोप होतो. त्याचे कारण ईडी, तसेच इतर शासकीय यं त्रणांना आमदार-खासदारांमागे लावले आहे, हे आहे. याशिवाय कोणत्या कारणाने ही मं डळी शिंदे गटात गेली हे त्यांनी सांगणे आवश्यक आहे. रवी राणा जनतेच्या मनातल्या भावना बोलून दाखवत आहेत. रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते यापुढे तसे बोलणार नाहीत. मात्र जनतेच्या मनातले मळभ कसे काढणार? प्रहारच्या ताकतीवर एखादी जागा मिळवण्यापलीकडे ज्या बच्चू कडूंची ताकत नाही, त्यांनी सरकारला ऐकवण्याच्या वल्गना करू नये. जो पक्ष चाळीस आमदार फोडू शकतो, तो एका आमदाराला घरी बसवू शकतो. कडूंना हे लवकर समजले आणि त्यांनी राणा प्रकरणात यशस्वी माघार घेतली. राणा प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांना बोलावून घेतले होते.

त्यांनी दोघांना जे बोधामृत दिले, ते दोघांनी नक्कीच समजुतीच्या पातळीवर घेतले आहे. कडू यांनी जे शक्तिप्रदर्शन के ले, त्यात त्यांनी पाच मागण्या सरकारकडे के ल्याआहेत. यातील बहुतेक मागण्या शेतकऱ्यांच्या सं दर्भातल्या आहेत. खरोखर शेतकऱ्यांच्या संदर्भात बच्चू कडूंनी काम करावे. राजकारण हे दय्यम ठेवावे. विनाकारण ओरडाआरडा केला, तर तुम्हाला वाटतात ते गैरसमज समजात बदलतील, एवढे पुन्हा लक्षात ठेवावे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये