ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी
“फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र!

मुंबई : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार दि. ३० रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सेनेशी बंड करुन भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळलंं.
दरम्यान, भाजपनं महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीसाठी राज्यपालांकडं मागणी केल्यावर सेनेकडून त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, न्यायालयानं सेनेची याचिका भेटाळत बहुमत चाचणी घेण्यास सांगितलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची राजीनामा दिला.
या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवू नका, ते धोका देतात असा सल्ला गोटे यांनी दिला आहे.