ताज्या बातम्यामहाराष्ट्र

झोपण्यापूर्वी मेकअप Remove करायला विसरू नका; नाहीतर होऊ शकते नुकसान, जाणून घ्या खास टिप्स

स्त्रिया या सुंदर दिसण्यासाठी मेकअप (Makeup) करतातच. तसंच त्या चेहऱ्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतात. तसंच मेकअप करणं प्रत्येक स्त्रीला आवडतं, त्यामुळे त्या मेकअप केल्याशिवाय राहू शकत नाहीत. मग कोणताही कार्यक्रम असो, कुठे बाहेर फिरायला जाताना असो स्त्रिया आवर्जून मेकअप करतातच. पण जसं मेकअप करणं गरजेचं आहे तसंच तो योग्य वेळी काढणं देखील गरजेचं आहे. विशेषत: रात्री झोपण्यापूर्वी न विसरता मेकअप काढणं गरजेचं असतं. जर तुम्ही असं नाही केलं तर तुमची स्किन डॅमेज होऊ शकते आणि तुम्हाला अनेक स्किन प्रोब्लेम्सचा सामना करावा लागू शकतो. तर आता आपण काही अशा सोप्या टिप्सबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला स्किन प्रोब्लेम्सचा सामना करावा लागणार नाही.

जर झोपण्यापूर्वी तुम्ही मेकअप रिमूव्ह नाही केला तर तुम्हाला मुरूम, सुरकुत्या, पिंपल्स अशा अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे दररोज रात्री झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्ह करणं महत्त्वाचं आहे. तर आता आपण मेकअप रिमूव्ह करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याबाबत जाणून घेणार आहोत.

1. मेकअप रिमूव्ह करत असताना सर्वात आधी तुमचा चेहरा क्लींजिंग किंवा कॉटन बॉल्सने साफ करून घ्या. तसंच आजकाल मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मेकअप रिमूव्हर्स उपलब्ध आहेत त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता. मेकअप रिमूव्ह करत असताना विशेषत: तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या.

2. जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरी सर्व मेकअप रुमूव्ह करता त्यानंतर टोनर जरूर वापरा. टोनर आपल्या चेहऱ्यावरील उरलेला मेकअप काढून टाकतो आणि आपल्या चेहऱ्यावर चमक आणतो. त्यामुळे मेकअप रिमूव्ह केल्यानंतर टोनरचा वापर जरूर करा.

3. तुम्ही जर हेवी मेकअप केला असेल आणि तो तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही क्लींजर ऐवजी माइल्ड फेस वॉशचा वापर करू शकता. मेकअप रिमूव्ह केल्यानंतर फेस वॉशने तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

4. स्त्रियांचा मेकअपमधील सगळ्यात आवडता भाग म्हणजे लिपस्टिक लावणे. स्त्रिया दररोज न विसरात लिपस्टिक लावतात. पण झोपताना ती पूर्णपणे काढून टाकणंही आवश्यक असतं. जर लिपस्टिक नीट रिमूव्ह केली नाही तर तुमच्या ओठांची त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे क्लींजरचा वापर करून तुम्ही तुमचे ओठ स्वच्छ करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये