पैसा हेच सर्वस्व मानू नका!

मित्रांनो, जगात आज अनेक अब्जाधीश असतील. पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मिळतो तो फक्त रॉकफेलर यांच्यामुळेच! हा प्रचंड श्रीमंत असूनही त्या दिवसात त्याचं फक्त एकच ध्येय होतं ते म्हणजे पैसा, पैसा आणि पैसा कमावणे! जिथे जिथे पैसा मिळेल ती जागा रॉकफेलर सतत शोधायचा! त्यावेळी त्याची मानसिकता अशी होती की, त्याला मित्र नको- नातीगोती नको- काहीच नको असायचं! असं करता करता तो ५३ वर्षांचा झाला आणि एके दिवशी आजारी पडला! त्याच्या डोक्यावरचे सर्व केस झडून गेलेत! हळूहळू तो कृश दिसायला लागला. कारण त्याच्या तोंडात अन्न जाईना! त्याला झोप लागेना. एवढेच नव्हे तर त्याला हसता आणि रडताही येईना! अमेरिकेतील सर्व नामवंत डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीपुढे हात टेकले. कारण त्यांना कुठलाही उपाय सापडत नव्हता! आपण आता फक्त एकच वर्षाचे सोबती आहोत, असं रॉकफेलरच्या खचलेल्या मनाने ठरवले होते! त्याच्या सुदैवाने स्वामी विवेकानंद त्या काळात शिकागो येथेच होते! स्वामीजी त्याच्यावर चांगला इलाज करतील असं कोणीतरी रॉकफेलरला सांगितलं. एवढं असूनही त्याने स्वामींना प्रत्यक्ष भेटण्याचं मुद्दाम टाळलं. तो म्हणाला की, स्वामी माझा इलाज काय करणार? कारण माझं भविष्य ठरलेलं आहे. मी संपलेलो आहे. पण मित्रांनो, कसं काय घडलं? अजूनही त्याचं उत्तर सापडलेलं नाही. कारण तो स्वतः दोन दिवसांनी स्वामींना भेटायला गेला. स्वामी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे जाऊन तो थांबला. त्याला अपेक्षा होती की, मी एवढा मोठा माणूस आहे. स्वामी मला स्वतः भेटायला येतील. पण स्वामींनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही! शेवटी तोच स्वामींना म्हणाला की, मी फार मोठा उद्योजक आहे. त्याचं सर्व ऐकल्यावर स्वामी विवेकानंद त्याला फक्त एवढेच म्हणाले की, आपलं काम सांगा? रॉकफेलरने त्याच्या आजाराची सर्व हकिकत स्वामींना सांगितली. स्वामी त्याला म्हणाले की, तू मनाने सैरभैर झालेला आहेस. मला तुझ्या आयुष्यातील सर्व घटना प्रत्यक्ष दिसत आहेत. स्वामी विवेकानंदांनी त्या सर्व घटना रॉकफेलरला जेव्हा सांगितल्या तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतरच्या चर्चेत स्वामी त्याला म्हणाले की, यावर फक्त एकच उपाय आहे की, तुम्ही आजपासून फक्त “दानधर्म” करीत राहा. मित्रांनो, रॉकफेलरवर स्वामींचा एवढा प्रभाव पडला की, त्यांनी “रॉकफेलर फाउंडेशन” नावानेच एक संस्था काढली. त्यातूनच पुढे मलेरिया, टीबी, प्लेग, कॉलरा अशा अनेक साथींच्या आजारावर संशोधन होऊन मोफत इलाज करण्यात आले. त्यामुळे पुढे अनेक वर्षे, किंबहुना आजही अनेक निष्पाप जिवांचे जीव वाचलेत! रॉकफेलर हा आजही जगातील सर्वांत मोठा डोनर समजला जातो. अमेरिकेतील एकूणएक डॉक्टरांनी त्याच्या आयुष्याची मुदत फक्त एक वर्षाची सांगितली होती. तो रॉकफेलर पुढे एकूण ९८ वर्षे आनंदात जगला. बिल गेट्स त्याच्या पुस्तकात लिहितात, डोनेशनची प्रेरणा फक्त आणि फक्त रॉकफेलर फाउंडेशनमुळे मला मिळाली. मित्रांनो, ही आहे एका हिंदू संन्याशाच्या तत्त्वज्ञानाची किमया! आपली ताकद आपण ओळखली पाहिजे! भौतिक सुखाच्या मागे लागूनसुद्धा पैसा हेच सर्वस्व नाही! वेळ आली की, तोही कामाला येत नाही! म्हणून द्यायला शिका, तरच तुम्हाला खरा जीवनाचा आनंद गवसेल!