ताज्या बातम्यारणधुमाळी
‘…कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका’; मुख्यमंत्री ठाकरेंचे पोलिसांना निर्देश

मुंबई : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही आदेशाची वाट पाहू नका असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिले आहेत. तसंच पोलिसांना कारवाईसाठी आता कुठल्याही प्रकारचा दबाव नसेल हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि पोलीस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्रतेनं पहायला मिळू शकतो.
आज राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर गृहमंत्रालयाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीची आढावा गृहमंत्री दिलीप वळसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रालयाला सांगितलं की, “कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी पोलिसांनी घ्यावी, यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नये”