डॉ. बोर्जेस यांना संशोधन राष्ट्रीय पुरस्कार

कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ वितरण
पुणे : कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार यंदा बंगळुरु, कर्नाटक येथील पर्यावरणशास्त्र संशोधक प्रा. डॉ. रेने बोर्जेस यांना तर, ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला साहस राष्ट्रीय पुरस्कार’ जोधपूर, राजस्थान येथील सारथी ट्रस्टच्या संस्थापक डॉ. कृती भारती यांना देण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. १०) या महिला राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
गुरुवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३०वा. एम.ई.एस. बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रुपये ५१ हजार आणि मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख आयोजक सुरेश रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ आणि जयश्री रानडे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ पंडवानी गायिका आणि लोककलावंत पद्मविभूषण डॉ. तीजन बाई आहेत. अध्यक्षस्थान माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पद्मभूषण चंद्रकांत गुलाबराव तथा चंदू बोर्डे भूषविणार आहेत. संशोधन आणि साहस क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या महिलांना २०११ सालापासून कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. या वेळी विविध क्षेत्रात बहुमूल्य योगदान देऊन समाजाप्रति कार्य करणाऱ्या पाच व्यक्तींना कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे विशेष सन्मान होईल.