ताज्या बातम्यापुणे

जिवावर बेतले तरी वाचवला जीव! जखमी अवस्थेतील डॉक्टरने वाचवले चेन्नईतील रुग्णाचे प्राण

पुणे | पुण्यातही एका अवयवदात्याने अवयदानाचे श्रेष्ठ दान केलं होतं. मात्र गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचत असताना अॅम्ब्युलन्सचा अपघात झाल्याने अनेकांना धक्का बसला. पण जखमी अवस्थेत डॉक्टरांनी रुग्णापर्यंत हा अवयव पोहोचवला आहे. पुण्याजवळील रुग्णालयातून फुफ्फुस घेऊन निघालेल्या अॅम्ब्युलन्सला शहरातील विमानतळाकडे जाताना अपघात झाला. त्यानंतरही, शल्यचिकित्सक आणि त्यांच्या पथकाने चेन्नईतील एका रुग्णाचे प्राण वाचवले. चेन्नईत काही तासांनंतरच फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले.

या अपघातानंतर डॉ.संजीव जाधव यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता चेन्नईत 26 वर्षीय तरुणाचे प्राण वाचवले आहेत. डॉ. जाधव त्यांच्या पथकासह पिंपरीतील डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधून 19 वर्षीय ब्रेन डेड रुग्णाच्या फुफ्फुस काढण्याच्या ऑपरेशनसाठी पुण्यात आले होते. तिथून त्यांना या फुफ्फुसांसह चेन्नई गाठायचे होते. परंतु दापोडीतल्या एका पुलावर संध्याकाळी अॅम्ब्युलन्सचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातमुळे डॉ.जाधव आणि त्यांच्या पथकाला गंभीर दुखापत झाली. मात्र अशा परिस्थितित त्यांनी चेन्नई गाठली.

चेन्नईतील युवक 72 दिवसांपासून लाइफ सपोर्टवर

चेन्नईत एक युवक 72 दिवसांपासून लाइफ सपोर्टवर होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तसेच फुप्फुस वेळेवर चेन्नईत पोहचले नसते तर ते निकामी झाले असते. यामुळे डॉक्टर संजीव जाधव यांनी आपल्या जखमांकडे लक्ष न देता चेन्नई गाठले आणि शस्त्रक्रिया केली. ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली त्याला फुप्फुसचा कर्करोग झाला होता. त्याच्यावर वेळीच उपचार झाला नसते तर त्याचा मृत्यू झाला असता. कारण त्याला ऑपरेशन टेबलवर आणले गेले होते. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टर संजीव जाधव यांनी सांगितले. पिंप्री चिंचवड येथील डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये तातडीने फुप्फुस काढण्यात आले होते. त्यामुळे हॉस्पिटल ते पुणे विमानतळ असा ग्रीन कॅरिडोर तयार करण्यात आला नव्हता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये