धर्म पूजे पुरता मर्यादित ठेवावा तो सार्वजनिक जीवनात आणु नये : डाॅ. श्रीपाल सबनीस
पुणे : (Dr. Shripal Sabnis On Journalist) पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येत असणारी गदा यावर बोलताना डाॅ. सबनीस म्हणाले, लोकशाही लुळीपांगळी झाली आहे. एकीकडे लोकशाही राजकीय पुढार्यांनी लुळीपांगळी केली आहे तर दुसरीकडे समाज सुधारकांचे अनुयायी तिची विटंबना करत आहेत. राजकीय पुढारी जर व्यवस्थेशी इमानदार राहत नसतील लोकशाहीच्या पावित्र्यांशी इमानदार राहत नसतील तर, त्याला महत्त्व रहात नाही. यासाठी ग्रामीण पत्रकारच भारताचे भावी विश्व आपल्या लेखणीमध्ये आणू शकतो. ग्रामीण लोकशाही जगली तरच एकूण लोकशाही जगेल भारताचे भारत पण ग्रामीण भारतावर अवलंबून आहे. निष्कलंक पत्रकारिता हे निष्कलंक भारताचे चरित्र असल्याचे ते म्हणाले.
राजकारणाचा बदलत चाललेला स्तर यामुळे आम्हाला हल्ली सभ्य, सोज्वळ शैलीमधील भाषण ऐकायला मिळत नाही. लोकशाहीत विरोधकांना सन्मान दिला जातो पण सध्याच्या राजकारणात एकमेकांना बुडवायला निघाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोकशाही मिळून ७५ वर्षामध्ये काय कमावले ती विकसित झाली का..? सामाजिक लोकशाहीत तीचे परिवर्तन झाले का..? असा सवाल डाॅ. सबनीस यांनी उपस्थित केला.
लोकशाहीचे मारेकरी ही राजकीय व्यवस्था असल्याने जनतेमध्ये विशिष्ट जागर होणे महत्त्वाचे आहे. या देशात संविधान साक्षरता झाली नाही. संविधानाला धर्म, जात नाही संविधान निधर्मीय आहे. धर्म निरपेक्ष आहे. आणि जात निरपेक्ष आहे. समाज धार्मिक आहे. संविधान मात्र निर्धमिय आहे. असा विसंवाद मुळातच आहे. आपण संविधानवादी संविधानाचा धर्म प्रमाण मानला पाहिजे आपला व्यक्तिगत धर्म पूजापुरता मर्यादित ठेवून तो सार्वजनिक जीवनात आणून हस्तक्षेप करून दुसऱ्या धर्माच्या छाताडावर लादण्याचा प्रयत्न करणं लोकशाहीला मारक असल्याने लोकशाही लवकर मरेन असे प्रतिपादन भारतीय संस्कृती व धर्मनिरपेक्ष भारत यावर बोलत असताना त्यांनी व्यक्त केले.
सध्याची राजकीय परिस्थिती प्रशासकीय व्यवस्था, पत्रकार कर्तव्य यावर सडेतोड खास शैलीत स्पष्ट मत व्यक्त केले. भिगवण परिसरात मराठी पत्रकार संघातील सर्व सदस्य समाज घडवण्याच्या दृष्टीने प्रामाणिक काम करत असल्याची भावना व्यक्त केली. मराठी पत्रकार संघ भिगवण आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सरपंच दिपीका क्षीरसागर, रियाज शेख, डॉ.अमोल खानावरे, अजित नाना क्षीरसागर प्रमुख उपस्थितीत होते.
आयोजित वक्तृत्व स्पर्धा लहान गटात प्रथम क्रमांक कु.गार्गी चवरे, द्वितीय क्रमांक क. अनुष्का सोलनकर, तृतीय क्रमांक कु.सानवी कणसे, उत्तेजनार्थ कु.स्वराली शेलार तर वत्कृत्व स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक कु.स्वीटी भोई, द्वितीय क्रमांक कु.ईश्वरी सोनवणे तृतीय क्रमांक कु. अश्वीनी शिंदे उत्तेजनार्थ कु. क्रांती शेळके व इतर पंचवीस विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन मराठी पत्रकार संघ भिगवण संघाचे अध्यक्ष तुषार क्षीरसागर, सोशल मिडिया अध्यक्ष सागर जगदाळे, सुरेश पिसाळ, डाॅ. प्रशांत चवरे, नारायण मोरे, संतोष सोनवणे, योगेश चव्हाण, आकाश पवार, नवनाथ सावंत, डाॅ.सुरेंद्र शिरसाट, अरुण भोई, सुनिल नगरे, आदी पत्रकार सहकारी यांनी केले.