महाराष्ट्ररणधुमाळी
राष्ट्रवादीची संस्कृती काढत, चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांना घेरलं; म्हणाले…

पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निदर्शने करण्यासाठी आले होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावरूनच आता दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांच्या ट्विटला उत्तर देत राष्ट्रवादीची संस्कृती काढली आहे.
दरम्यान, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे-वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल का? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनीच ही संस्कृती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच ‘हात’ आहे? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी आमदार रोहित पवार यांना विचारला होता.