Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी भारताला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती !

नवी दिल्ली – Dropadi Murmu The First Tribal Women President Of India : भारताला स्वातंत्र्य होऊन तब्बल ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा आदिवासी व्यक्ती देशाची पहिली नागरिक म्हणून राष्ट्रपती पदावर रूढ झाली आहे. युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मागे टाकत एनडीएच्या उमेद्वार द्रोपदी मुर्मू या राष्ट्रपती निवडणुकीत निवडून आल्या आहेत. मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती बनल्या आहेत. त्या 24 जुलैला राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.

मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर मुर्मू यांनी आवश्यक तो पन्नास टक्के मतांचा कोटा पूर्ण केला होता. ५ लाख ४३ हजार २६१ मते आवश्यक असताना तिसऱ्या फेरीत मुर्मू यांना ५ लाख ७७ हजार ७७७ मते मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना २ लाख ६१ हजार ६२ मते मिळवता आली. त्यात राज्यसभा आणि लोकसभा खासदारांसह २० राज्यांतील मतांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांनी मुर्मू यांच्या घरी पोहोचून त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील ट्वीट करून मुर्मू यांचे राष्ट्रपती निवडणुकीत जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

मुळात एनडीए कडून आदिवासी महिलेचे राष्ट्रपती पदासाठी उमेद्वार म्हणून नाव घोषित केल्यानंतर देशातील अनेक विरोधी पक्षांनी त्यांनाच पाठींबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात क्रॉस वोटिंग झाल्याचंही सांगितल्या जात आहे. दरम्यान, निकाल लागण्याच्या अगोदरच भाजप नेत्यांकडून आणि आदिवासी समाजाकडून मुर्मू राष्ट्रपती निवडणूक जिंकल्या म्हणून घोषित करण्यात आलं होतं. आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष देखील करण्यात आला होता.

द्रोपदी मुर्मू या दुसऱ्या महिला राष्ट्रपती देशाला लाभल्या आहेत. याआधी देशाच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील लाभलेल्या होत्या. प्रतिभाताई पाटील यांनी देखील 21 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक जिंकली होती. २००७ ते २०१२ या काळात त्यांनी भारताचे राष्ट्रपती पद भूषवले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये