क्राईमपुणे

पुण्यात ड्रग्सतस्करी थांबेना !

नशेखोरांना कुरिअरद्वारे होतेय होम डिलिव्हरी; विश्रांतवाडीत एकाला अटक

विश्रांतवाडी येथे ड्रग्ज कारवाईमध्ये पुणे पोलिसांनी एका कुरीयर कर्मचाऱ्याला अटक केली आहे. यावरून अमली पदार्थ तस्करांकडून देण्यात आलेले अमली पदार्थ कुरिअर कंपनीतील कर्मचारी नशेबाजांना पोहोचवित असल्याचे तपासात उघड झाले आहे.

विश्रांतवाडी भागातून एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन नुकतेच जप्त करण्यात आले. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कुरिअर कंपनीतील एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली. विश्वनाथ कोनापुरे (वय ४८ , रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीतील धानोरी भागात छापा टाकून पोलिसांनी एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी श्रीनिवास संतोष गोंदजे, रोहित बेडे, निमेश आबनावे यांना अटक करण्यात आली हाेती. आरोपींनी मेफेड्रोन कोठून आणले, तसेच त्यांनी कोणाला विक्री केली यादृष्टीने तपास करण्यात आला.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार कोनापुरेला अटक करण्यात आली. कोनापुरे एका कुरिअर व्यावसायिकाकडे काम करत होता. तो आरोपींच्या संपर्कात होता. आरोपींनी दिलेले मेफेड्रोन कोनापुरे नशेबाजांना घरपोच देत पुणे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कोनापुरेला अटक केले. आरोपींनी पुणे शहर, तसेच परगावात मेफेड्रोनची विक्री केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये