इतरक्रीडाताज्या बातम्या

डोपिंगमध्ये अडकली दुती चंद, 4 वर्षे निलंबनाची कारवाई

नवी दिल्ली | Dutee Chand – भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद (Dutee Chand) डोपिंगच्या जाळ्यात अडकली आहे. प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनामुळे तिच्यावर चार वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. धावपटू दुती चंदने प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

दुतीच्या डोपिंग टेस्टमध्ये सिलेक्टिव एंड्रोजन रिसेप्टर मॉड्यूलेटर हा प्रतिबंधित पदार्थ आढळला होता. त्यानंतर तिचे तात्पुरते निलंबन करण्यात आले होते. आता तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

दुती चंदने आशियाई स्पर्धेमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. दुतीने २०२१ साली ग्रां प्रीमध्ये १०० मीटर स्पर्धा ११.१७ सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम रचला होता. आता तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय अ‍ॅथलीट दुती चंदवरील बंदी जानेवारी २०२३ पासून ग्राह्य धरली जाईल.

‘द ब्रिज’च्या रिपोर्टनुसार, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) च्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी डोपिंग चाचणीसाठी दुती चंदचे नमुने घेतले होते. दुतीच्या पहिल्या नमुन्यात अँडारिन, ऑस्टारिन आणि लिंगंड्रोल आढळले आहेत. दुसऱ्या नमुन्यात अँडारिन आणि ऑस्टारिन हे प्रतिबंधित पदार्थ आढळले आहेत.

जानेवारी २०२३ पासून बंदी

नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने या वर्षी जानेवारीमध्ये दुतीला निलंबित केलं होते. यामुळे ती आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमधून बाहेर पडली होती. ५ डिसेंबर २०२२ रोजी भुवनेश्वरमध्ये दुतीची चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये दुती पॉझिटिव्ह आली होती. जानेवारी २०२३मध्ये दुती चंदवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

दुती चंदला जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक

दुती चंद ही भारतातील स्टार महिला धावपटूंपैकी एक आहे. दुती चंद ही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला धावपटू आहे. तिने आशियाई गेम्समध्ये २०१८ मध्ये १०० मीटर आणि २०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

समलैंगिक पार्टनरसोबत प्रेमसंबधात

दुती हिने आपण समलैंगिक असल्याचे आधीच जाहीर केले होतं. त्यानंतर दुतीने तिची मैत्रिण मोनालिसासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती सोशल मीडियावरुन शेअर केली होती. या दोघींनी लग्न केल्याच्याही चर्चा आहेत. मात्र त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये