मुख्यमंत्री सोरेन यांच्यामागे ईडीची पीडा…

रांची : झारखंडची राजधानी रांची येथून मोठी बातमी येत आहे. झारखंड उच्च न्यायालयानं हेमंत सोरेन यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या जवळच्या लोकांची ईडीव्दारे चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. खरं तर, सोरेन कुटुंबाच्या मालमत्तेच्या चौकशीसंदर्भात झारखंड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. या संपूर्ण प्रकरणात हेमंत सोरेन, बसंत सोरेन, रवी केजरीवाल आणि अमित अग्रवाल यांच्यासह 13 जणांच्या संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टानं सुनावणीदरम्यान दिलेत.

कंपनीचे रजिस्ट्रार आणि ईडी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. कंपनीचे रजिस्ट्रार या प्रकरणात सहभागी असलेल्या 300 हून अधिक कंपन्यांची क्रेडेन्शियल तपासणी करतील आणि संपूर्ण अहवाल न्यायालयात सादर करतील. यासोबतच कंपनी निबंधकांशी समांतर चौकशी करून ईडी आपला अहवालही न्यायालयात सादर करणार आहे. याप्रकरणी हेमंत सोरेन, बसंत सोरेन, अमित अग्रवाल, रवी केजरीवाल, रमेश केजरीवाल, राजीव अग्रवाल, निधी अग्रवाल, प्रेमनाथ माळी, रंजन साहू, विवेकानंद राऊत यांच्यासह 13 जणांच्या संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना याचिकाकर्ते शिवशंकर शर्मा म्हणाले, या संपूर्ण प्रकरणात शेल कंपन्यांचा मोठा हात आहे. या शेल कंपन्यांमध्ये पैसा कसा गुंतवला गेला आणि त्यातून नफा कसा झाला. या सर्व प्रकरणांची ईडी चौकशी करणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. याप्रकरणी महाराष्ट्रात राहणारे बसंत सोरेन यांचे नातेवाईक सुरेश नागर यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आलेत.

Prakash Harale: