राष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

प्रभावीपणे आरोग्य सेवेची माहिती देणारी सर्वंकषपुस्तिका

पुणे : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे तर्फे सातत्याने नवनवीन अभिनव उपक्रम राबवण्यात येतात. या अनुशंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी व नव्याने रुजू होणारे वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी या सर्व बाबींवर अभ्यासपूर्ण माहिती देणारी पुस्तिका करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी संकल्पना मांडण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या माहिती पुस्तिका, स्टैंडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स, एसओपी या सर्वांचा अभ्यास करण्यात येऊन या माहिती पुस्तिकेत समावेश करण्यात आलेला आहे.

क्लिनिकल गाईडलाईन्स फॉर मेडिकल ऑफिसर या माहिती पुस्तिकेत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बाह्य रुग्ण विभागात नियमितपणे येणारे सर्वसाधारण आजारांचे रुग्ण, असंसर्गजन्य आजारांचे रुग्ण, प्रसूतिशास्त्र व स्त्री रोग याबाबतचे रुग्ण यांच्या विविध बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. याच सोबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात साथरोग परिस्थिती निर्माण झाल्यास साथरोग उपाययोजना करून प्रतिबंध करण्यासाठी अत्यावश्यक असणारया सर्वंकष उपाययोजनांबाबतया पुस्तिकेत माहिती देण्यात आलेली आहे.


मागील संपूर्ण वर्षभरात तसेच यावर्षी एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात येऊन कोण कोणत्या आजारांची रुग्ण प्रा केंद्रमध्ये सातत्याने येतात व त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांना कुठल्या आजारांना, साथ रोगांना, असंसर्गजन्य आजारांना, न्याय वैद्यकीय बाबींना सामोरे जावे लागते याबाबत अभ्यास करण्यात आला. वरील अभ्यासाच्या निष्कर्षाच्या आधारे एक सर्वंकषपुस्तिका तयार करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजयकुमार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची निवड करण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नव्याने रुजू होणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा देताना कार्यक्षेत्रामध्ये अडचणी येऊ नये यासाठी या पुस्तिकेत न्याय वैद्यक सेवांबद्दलही माहिती देण्यात येऊन राज्य शासनाच्या नॅशनल क्वालिटी अन्शुरन्स, कायाकल्प या बाबींचाही समावेश करण्यात आला आहे.कार्यक्षेत्रामध्ये दुर्दैवाने मोठी नैसर्गिक आपत्ती, अपघात झाल्यास त्यावर करायच्या उपाययोजना याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

ही पुस्तिका बनवताना उपलब्ध असणारे त्या त्या विषयांचे पुस्तक, निर्धारित मार्गदर्शक सूचना, विविध अभ्यास पेपर्स, स्टैंडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स या सर्वांचा अभ्यास करून त्यांचे संकलन या पुस्तिकेत करण्यात आलेले आहे. पुणे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही पुस्तिका दिल्याने त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये एक संदर्भ पुस्तिका म्हणून तात्काळ वापर करता येणे शक्य आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुजू होणाऱ्या नवीन बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना या पुस्तिकेमुळे कार्यक्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करता येणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील जनतेस अजून प्रभावीपणे आरोग्य सेवा मिळण्यास नक्कीच मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये