क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

एकनाथ खडसेंना मोठा झटका! भूखंड घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाने ‘ही’ मागणी फेटाळली

पुणे : (Eknath Khadse alleged land scam) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी न्यायालयाने खडसेंना अटकेपासून दिलेले संरक्षण सोमवारी संपले आहे.

भोसरी भूखंड घोटाळा (Bhosari Land Scam) प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात १ हजार पानी आरोपपत्र दाखल केले.आरोपपत्रात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी यांची नावे आहेत. या जमीन घोटाळ्यात खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली होती. त्यांना काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला आहे.

एकनाथ खडसे यांनी पुण्यात त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

यामुळे खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी बंडगार्डन पोलिसांत खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये