नाशिक : (Eknath Khadse On Devendra Fadanvis) आज नाशिकमध्ये अखिल भारतीय महानुभाव संमेलन अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडलं. यावेळी कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
दरम्यान, अखिल भारतीय महानुभाव संमेलनात व्यासपीठावर भाजपचे नेते मंडळी पदाधिकारी उपस्थित असताना चर्चा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची सुरू होती. व्यासपीठावर खडसे वेगळ्या खुर्चीवर आणि भाजप पदाधिकाऱ्यांपासून लांब बसले होते. एकनाथ खडसेंना सगळ्यांनी एकटे पाडले अशी चर्चा कार्यक्रमात रंगली होती. कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी भाषणही केले. मात्र या सर्वांना खडसे सरस ठरल्याचे दिसून आले.
भाषण संपल्यानंतर खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात गुप्तगु केली. यामुळे नेमके खडसे यांनी फडणवीस यांच्या कानात काय सांगितले असेल? यावर उपस्थितांमध्ये मात्र चर्चा रंगू लागल्यानं भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर नाराजी पहायला मिळाली.