एकनाथ खडसेंच्या पत्नी विरोधात सर्व विरोधक एकवटले, खडसे म्हणाले; ‘शेर तो अकेला आता हैं…;

जळगाव : (Eknath Khadse On Girish Mahajan) जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदा खडसे यांना पाडण्यासाठी दोन मंत्री, भाजपचे सर्व आमदार-खासदार कामाला लागले आहेत, मात्र शेर तो अकेला होता है…. झुंड मे तो गिधाड आते हैं’ असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना प्रतिआव्हान दिले आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदाकिनी खडसे इतक्या पावरफुल आहेत की त्यांना पाडण्यासाठी दोन-दोन मंत्री, भाजपचे सर्व आमदार-खासदार कामाला लागले आहेत. मी इतका पवरफुल आहे की माझ्यामुळे एवढ्या जणांना भिंगरी लागली असे म्हणत आमदार एकनाथ खडसे यांनी दूध संघ निवडणुकीत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या राजकारणाचा समाचार घेतला.
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, “माझ्या मागे इडी, सीबीआय लावतात. माझ्या जावयाला जेलमध्ये टाकलं. आता मला आणि माझ्या बायकोला जेलमध्ये टाकण्यासाठी यांचे षडयंत्र सुरू आहेत. सत्तेचा माज आणि मस्ती सुरू असून मला बघून घेईन म्हणतात.