ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

शिंदेंची साथ भाजपला अडचणीची? लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी BJP आग्रही

मुंबई : (Eknath Shinde And Devendra Fadnvis) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी राज्यात मध्यवर्ती निवडणूका लागणार असल्याचे भाकित केलं होतं. त्यामुळे लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. त्यातच आता ‘द हिंदू’च्या बातमीने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पुढील वर्षी ‘एप्रिल-मे’मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसोबत विधानसभा निवडणूकही घेण्याचा प्रस्ताव भाजपने दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘द हिंदू’ च्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ‘द हिंदू’च्या मते महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसोबतच घेण्याचा विचार भाजपच्या नेतृत्वाकडून सुरू आहे.

राज्यातील विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच घ्यावी असा प्रस्ताव प्रदेश भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नुकतीच दिली आहे.

यासर्व घडामोडीनंतर राजकीय गोटात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. या प्रस्तावामागे भाजपची नेमकी खेळी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. युतीवेळी फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षाकडे १०५ आमदार असतानादेखील एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिलं. फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्विकारायला लागणं. यामुळे होणारी पक्षातील अस्वस्थता घुसमट. यासर्वामुळे राज्यात वर्चस्व कुणाचं हवं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागा आम्ही स्वबळावरच लढणार असल्याचं वक्तव्य भाजपच्या बड्या नेत्यानं केलं आहे. भाजपने अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा दिला आहे. भाजपचे विधानसभेत सध्या १०५ सदस्य असून आठ अपक्ष आपल्याबरोबर असल्याने आपले ११३ आमदार आहेत. भाजप ६० मतदारसंघात काही वेळ हरला आहे किंवा जिंकला आहे. या जागांची संख्या १७३ होते. त्यापैकी शिंदे गटाकडे असलेले १२ मतदारसंघ सोडले तरी अन्य मतदारसंघात भाजपला जिंकण्यासाठी आणखी ८ टक्के मते हवी आहेत. भाजपकडे ४३ टक्के मते असून आपल्याला ५१ टक्के मते मिळवायची आहेत.

नुकतचं पुण्यात पोटनिवडणुका पार पडल्या. कसब्यात मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणुका घेण्यात आल्या होत्या. मात्र, कसब्यात ३० वर्षांचा भाजपचा गड कोसळला. तब्बल ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यामध्ये धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय झाला. चिंचवडची जागा जिंकली असली तरी त्यात महाविकास आघाडीच्या बंडखोराचे मोठे योगदान असल्याचे निकालातून पुढे आले आहे. झालेल्या पोटनिवडणुकीत लाखोंची उधळण पाहायाला मिळाली. मात्र, म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही.

पाच जागांसाठी झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये फक्त एका जागेवर भाजपला यश मिळवता आले. दुसरीकडे नागपूर आणि अमरावती सारख्या ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले होते. नागपूर शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार नागो गाणार यांचा काँग्रेस उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पराभव केला. गाणार गेले 12 वर्षं या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. तर, अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपच्या डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये