देश - विदेश

‘कुणाला आवडो न आवडो आपली फुल ऑथरिटी’! ‘धर्मवीर २’वर बोलताना शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Eknath Shinde Dharmaveer Anand Dighe Biopic : मराठी चित्रपट विश्वात ज्या चित्रपटानं मोठी खळबळ उडवून दिली होती आणि ज्यावरुन महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते त्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा, शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

र्मवीरच्या पहिल्या भागानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची जोरदार चर्चा रंगली आहे. आज मुंबईमध्ये धर्मवीर च्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाच्या मुहूर्ताला प्रारंभ झाला. त्याला दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेते प्रसाद ओक यांच्यासह अनेक कलाकार व्यासपीठावर उपस्थित होते.

मुहूर्त प्रारंभ आणि चित्रिकरणाला सुरुवात झाल्यानंतर एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या शैलीत राजकीय फटकेबाजी केली आहे. त्यात त्यांनी गेल्या धर्मवीर चित्रपटाविषयीच्या आठवणी आणि त्यावरुन झालेले राजकारण, झालेला वाद आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया याविषयी सांगितले. ते म्हणाले, येत्या काळात धर्मवीरचा दुसरा भाग हिंदीत देखील यायला हवा. केवळ महाराष्ट्रापुरताच हा चित्रपट मर्यादित राहणार नाही याची काळजी निर्मात्यांनी घ्यावी.

मला माहिती आहे की, जेव्हा धर्मवीर प्रदर्शित झाला होता तेव्हा काही लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या ते, काही जण चित्रपट अर्धवट पाहून उठून गेले. काही जणांनी त्यातील सीन खटकले. मात्र आता यापुढील काळात कुणाला काहीही वाटो, कुणाला आवडो ना आवडो आपणच फुल ऑथरिटी असून येत्या काळात धर्मवीरचा दुसरा भाग तयार करणार. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिग्दर्शक आणि निर्माते यांना काही सुचनाही केल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये