ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

डेअरिंग करत मुख्यमंत्री झाले, अन् आता शिंदेंच थेट इंग्रजीतून भाषण..

रत्नागिरी : (Eknath Shinde English Speech Ratnagiri) डेअरिंग केले म्हणून मुख्यमंत्री झालो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंदी बोलताना चाचपडणारे शिंदे आता बिनधास्त हिंदी बोलताना दिसतात. यातच त्यांनी आता थेट इंग्रजीतूनच भाषण केले. रत्नागिरीतील खेडमध्ये एका कंपनीच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्र्यांनी शुद्ध इंग्रजीतून आपल्या महाराष्ट्राची महती सांगितली. या कंपनीचे स्वागत करत भविष्यातही एकत्र काम करण्याची ग्वाही शिंदेंनी या वेळी दिली.

खेड येथे गुरुवारी हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस कंपनीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी (Eknath Shinde) मुख्यमंत्री शिंदेंनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणास सुरुवात केली. मात्र, कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट इंग्रजीतून त्यांचे स्वागत. ‘वेलकम मिस्टर जॉन रॉडरिग्ज अॅन्ड ऑल रिप्रेझेन्टेटिव्ह फ्रॉम हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस ऑन सॅक्रेड लँड ऑफ कोकण..’, असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणचा विकास होत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, ‘ठंडा मतलब कोका कोला नाही, तर आता ठंडा मतलब डेव्हलपमेंट, विकास असेही म्हणावे लागेल. रत्नागिरीला रत्नभूमी म्हणतात. कोकणात पारंपरिक व्यवसायाचे संवर्धन करून जगाची गरज ओळखून औद्योगिकतेची कास धरली पाहिजे. यातूनच ही कंपनी दोन टप्प्यात दोन हजार पाचशे कोटींची गुंतवणूक करत आहे.’

‘मिस्टर जॉन महाराष्ट्रा इज ग्रोथ इंजिन ऑफ इंडिया. हिअर इज बिजनेस फ्रेंडली इन्व्हायर्न्मेंट. हॅज अलवेज एन्करेज हेल्थी पार्टनरशीप बिटवीन इंडस्ट्रीज अॅन्ट कम्युनिटी. महाराष्ट्रा इज वन ऑफ द इंडस्ट्रलाइज स्टेट टुडे. वी ऑफर न्यू सबसिडीज न्यू कंपनीज. वी हॅव स्कील्ड मॅनपॉवर, गुड इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी अँड अॅम्पल लँड फॉर कंपनीज.’

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये