“दोन वर्षापूर्वी ‘असे’ निर्णय घेतले असते तर ही वेळ आलीच नसती”

मुंबई – President Elections 2022 : महाराष्ट्रातील राजकीय नाट्यानंतर देशात राष्ट्रपती निवडणुकीचं वारं वाहत आहे. सत्ताधारी पक्ष भाजप आणि विरोधी पक्ष कॉंग्रेस यांपैकी कोणाला पाठींबा द्यायचा यावरून राजकारण सुरु आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांनी कॉंग्रेसला पाठींबा द्यावा असं आवाहन कॉंग्रेस नेत्यांकडून आणि मित्रपक्षांकडून केलं जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी कॉंग्रेसला पाठींबा द्यावा असं पत्राद्वारे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी आवाहन केलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपला पाठींबा द्रोपदी मुर्मू यांनाच असणार आहे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधान आल्याचं दिसत आहे. अशातच, शिवेनेचे बंड करून भाजपसोबत सत्तेत आलेले एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपला पाठींबा देत असल्याचा निर्णय आता घेतला असला तरी त्याबाबतचा निर्णय आम्ही अडीच वर्षांपूर्वीच घेतेलेला आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी म्हटलं आहे. “अशा प्रकारचे निर्णय त्यांनी अडीच वर्षापूर्वीच घेतले असते तर, आता ही वेळ आलीच नसती” असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.