ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

”दिल्ली जेवढं फडणवीसांचं ऐकते तेवढं मुख्यमंत्री शिंदेंचं ऐकणार का?”

मुंबई : (Eknath Shinde in New Delhi Tours) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार दि. 21 रोजी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, या दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. दिल्ली जेवढं देवेंद्र फडणवीस यांचं ऐकतात तेवढं एकनाथ शिंदेंचं ऐकणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी उपस्थित केला आहे. यावेळी ते हिंगोलीत माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान यावेळी पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला सोबत नसतील तर, कदाचित दिल्लीतील भाजप हायकमांडची भेटही होणार नाही असा टोलाही पाटीलांनी यावेळी लगवाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकटे दिल्लीला जाऊन काय उपयोग? असा सवाल उपस्थित केला आहे.

एका बाजूला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला, तेव्हापासून राज्याचे राजकारण चांगलेच तापलेलं पहायला मिळत आहे. याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते मोदी-शहा यांची भेट घेऊन, राज्यातील उद्योगावर चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र, फडणवीस दिल्ली दौऱ्याला सोबत नसताना एकनाथ शिंदेंवर दिल्ली भाजप मेहरबान होणार का? असे प्रश्न आत्तापासूनच उपस्थित होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये