ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिंदे गट-भाजप बिघाडीत तोडगा? दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा..

मुंबई : (Eknath Shinde On Devendra Fadnavis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघात स्थानिक भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांनी शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पेटला होता. मात्र या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तोडगा निघाल्याचे समजते. बंद दाराआड चर्चात दोन्हीकडच्या नेत्यांनी युतीचा धर्म पाळावा असे सांगातानाच सबुरीचा सल्लाही दिल्याचे समजते.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आणि भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने हा वाद चांगलाच चिघळला होता. कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा-प्रतिदावा यामुळे हा वाद टोकाला गेला होता. शेवटी दोन्ही पक्षातील मुख्य नेत्यांनी यावर चर्चा करून तोडगा काढला आहे. हा वाद ताजा असतानाच शिंदे गटाकडून दोन दिवसांपूर्वी राज्यातील प्रसिद्ध वृत्तपत्रात देवून भाजपला डिवचण्याच काम केलं. यामुळे दोन्ही पक्षातील दुरी आणखीन वाढली. मात्र, यावर दोन्ही पक्षातील नेत्यांचे संगनमत होवून तोडगा काढण्यात आला आहे,

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळीच पालघर येथील कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांना सबुरीचा सल्ला देत युतीधर्माचे पालन करण्यास सांगितले. त्यानंतर लगेचच संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशीही चर्चा केली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेदरम्यान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडून निर्माण केल्या जाणाऱ्या अडचणींचा पाढाच श्रीकांत यांनी वाचला. यावर फडणवीस यांनी यापुढे असे घडणार नसल्याचा शब्द दिल्याचे समजते. मात्र त्याचवेळी त्यांना युतीधर्माचे पालन करण्यासही सांगितल्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये