ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

भाजप-शिंदे गटात मिठाचा खडा! शिंदे गटाकडून भाजप नेत्याला बेदम मारहाण

मुंबई : (Eknath Shinde On Devendra Fadvanis) मुंबईतील दहिसर पूर्व येथे बॅनर लावण्यावरून शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते विभिषण वारे यांना मारहाण केली, या मारहाणीत वारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वारे हे गेल्या 14 वर्षांपासून प्रकाश सुर्वे यांच्यासोबत काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिंदे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या रागातूनच हल्ला झाल्याचं विभीषण वारे यांनी म्हटलं आहे.

या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या मध्ये डझनभर लोक हातात काठ्या घेऊन दिसत आहेत. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच पोलिसांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत राजकीय सूडापोटीच वारे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं असून भाजपकडून याचा निषेध करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये