ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला दावोसचा ‘तो’ किस्सा, अन् पंतप्रधान मोदी खळखळून हसले!

मुंबई : (Eknath Shinde On Narendra Modi) गुरूवार दि. 19 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) यांच्या हस्ते मुंबईतील मेट्रोसह विविध कामाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभेत बोलताना, राज्यातील विकासकामांचा पाढाच मोदींसमोर वाचला. तसंच मोदींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव देखील केला आहे. यावेळी त्यांनी दावोसमध्ये घडलेला एक किस्सा मोदींसमोर सांगितला (Narendra modi) अन् पंतप्रधान खळखळून हसले.

दरम्यान शिंदे म्हणाले, जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणीही मोदींचीच हवा होती, अनेक देशाच्या पंतप्रधानांनी फक्त मोदींबद्दलच विचारलं असं मुंख्यमत्री शिंदे म्हणाले. येत्या काळात मोदींच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरामोहरा बदलून टाकणार असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. “दावोसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक देशांचे पंतप्रधान भेटले, अधिकारी भेटले. त्या ठिकाणीही मोदींचे भक्त होते. त्यांनी मला विचारलं की तुम्ही मोदींसोबत आहात का? त्यावेळी मी म्हणाले की मी त्यांचाच माणूस आहे.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहिती आहे. अगदी ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ नरेंद्र मोदींच्यामुळे अशी स्तुतीसुमनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांवर उधळली. काही लोकांना वाटायचं की या कार्यक्रमाचे उद्धाटन मोदींच्या हातून होऊ नये, पण नियतीसमोर कुणाचं काही चालत नाही,” ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये