एकनाथ शिंदेंकडून नवीन कार्यकारणी जाहीर; उद्धव ठाकरेंना दिलं ‘हे’ पद!

मुंबई : (Eknath Shinde On Shivsena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून सोमवार दि. १८ रोजी शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त केली असून, त्याचबरोबर नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासाठी पुन्हा एकदा धक्का मानला जात आहे. शिंदे गटाकडून घोषित करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना मुख्यनेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
तर अन्य काही नेत्यांवर पक्षाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. दिपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी ज्यांची सेनेतून हकलपट्टी केली आहे. शिंदे यांनी त्यांच्याच हाती शिंदे गटाचा झेंड दिला आहे.
शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर तानाजी सावंत, विजय नहाटा, यशवंत जाधव, गुलाबराव पाटील यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांचे नाव कायम ठेवले आहे.