मुख्यमंत्र्यांनी सांगितला चार महिन्यापुर्वीचा बंडखोरीचा ‘तो’ किस्सा, म्हणाले; “आम्ही देखील बरचं पर्यटन…”

नाशिक : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले, “पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे, सध्या काही वेग मंदावला आहे. त्याला गती मिळाली पाहिजे. आम्ही देखील तीन महिन्यापुर्वी बरचं पर्यटन करुन आलो आहोत, त्यामुळे नक्कीच नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळेल’. असे बोलून त्यांनी चार महिन्यापुर्वीच्या बंडखोरी करताना केलेल्या मुंबई, ठाणे, सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई या प्रवासाला उजाळा दिला आहे.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, नाशिक देखील विकासाच्या माध्यमातून बदललेलं दिसेल. यावेळी संभाजीराजेंनी गडकिल्ल्यांचा विषय घेतला. संभाजीराजे रायगडाचे काम करतात. आपल्या राज्यातले सर्वच गडकिल्ले हे आपली ऐतिहासिक संपत्ती आहे. नाशिक शहर हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे त्यामुळे सरकार त्याला प्रधान्याने पुढे घेऊन जाणार आहे.
सारथीच्या माध्यमातून मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या तरुणांना दिशा मिळत आहे. सारथीच्या जडण-घडणीत मुख्यमंत्री शिंदेंचे मोठं योगदान असून त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानतानी सारथी च्या योजना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी यावेळी केले.