मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, “…तर यापेक्षा मोठं पाप काय असेल”

पुणे : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, आम्ही वर्षभरापूर्वी जो निर्णय घेतला तो अगदी योग्यच होता, त्याचं कारण आज स्पष्ट झाल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला विरोध केला त्यांच्यासोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले होते. आम्ही जो निर्णय घेतला तो बरोबर होता हे आता सिद्ध झालं असून मुफ्तीसोबत सरकार स्थापन केलं, असा भाजपवर आरोप करणारे काल त्यांच्यासोबत बसले होते.

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले, चारा घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत अशा लोकांसोबत काल बसले यातच सगळं आलं. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांबरोबर तुम्ही साटंलोटं करतात. पंधरा पक्ष एकत्र येतात त्यांच्यातला कॉन्फिडन्स गमावल्याचं दिसून येत आहे. याच्यातच मोदींचं यश आहे.

मागील निवडणूकीत २०१४, २०१९ ला आघाड्या झाल्या होत्या. तरीही देशातल्या जनतेने ४० पेक्षा जास्त खासदार निवडून दिले नाही. विरोधी पक्ष नेताही देशातल्या विरोधकांना होता आलेलं नाही. देशाची प्रतिमा जगभरात उंचावण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. विरोधकांना देशाचं, नागरिकांचं देणंघेणं नाही. यांना स्वतःचा परिवार, स्वतःचा पक्ष याचंच देणंघेणं आहे.

शिंदे पुढे म्हणाले की, ठाकरे आता पालिकेतील घोटाळ्याबाबत आरोप करीत आहेत. डेड बॉडीच्या बॅगची किंमत सहा हजार रुपये लावत असाल तर यापेक्षा मोठं पाप काय असेल. राजकीय सूडापोटी कुठलीही कारवाई केलेली नाही. ईडीच्या कारवाईत आम्ही हस्तक्षेप करीत नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Prakash Harale: