ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

धक्कातंत्र सुरुच! छ. संभाजीनगरमध्ये माजी महापौरांसह पदाधिकांऱ्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश

छ. संभाजीनगर : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) शिवसेना पक्षाचा सध्या संघर्षाचा काळ सुरू आहे. साधारण १३ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे याच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. शिंदे यांनी पक्षातील ४० आमदार आणि १३ खासदारांना बरोबर घेत आधी वेगळा गट बनवला आणि नंतर थेट शिवसेना पक्षावरच दावा केला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देत पक्षचिन्हदेखील त्यांनाच दिलं आहे.

दरम्यान, तेव्हापासून आतापर्यंत एकनाथ शिंदेंनी शिवसेना खिळखिळ करुन सोडले आहे. उद्धव ठाकरेंवर त्यांनी अनेक धक्कातंत्राचा वापर केला. मागली वर्षभरापासून शिवसेनेला लागललेली गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सातत्याने शिंदे गटात प्रवेश सुरू आहेत. गेल्या महिन्यात विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला. त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला.

दरम्यान, आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. संभाजीनगरचे माजी महापौरांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या नव्या साथीदारांचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षात स्वागत केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये