“ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं आनंद दिघे यांचं स्वप्न होतं”; एकनाथ शिंदे

ठाणे : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) राज्यात दहीहंडी उत्सह सार्वजनिक करण्यासाठी दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंग दिघे यांचे मोठे योगदान आहे. ठाणे जिल्ह्यात टेंभी नाका येथे त्यांनी प्रथम दहीहंडी उत्सव साजरी केली. तेव्हापासून टेंभी नाका या दहीहंडीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे आणि मानली लाभला आहे. आनंद दिघे यांचे शिष्य मानले जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड पुकारले. अन् भाजपच्या मदतीने नवीन सरकार स्थापन केलं. दिघेंची शिकवण होती गद्दारांना माफी नाही. हे शिंदेंना कितपत उमगत आहे हे त्यांनाच माहीत.
दरम्यान, आज राज्यात दहीहंडी उत्सह मोठ्या थाटात साजरी होत आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रभर फोफावला आहे. मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेंभी नाक्याला सलामी देऊन पुढे जातो. हा आपला इतिहास आणि परंपरा आहे. ही परंपरा वाढवण्याचं आणि जोपासण्याचं काम आपलं आहे.
ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. त्यांच्या पुण्याईमुळे आणि आशीर्वादामुळे मला मुख्यमंत्री म्हणून या दहीहंडीला उपस्थित राहता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील सर्वात मोठी हंडी फोडली आहे. ती हंडी फोडणं तसं कठीण काम होतं आणि ती खूप उंचही होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही ती हंडी फोडू शकलो. आम्ही ५० थर लावले होते. हे थर आणखी वाढत जातील, याची काळजी करायचं काहीही कारण नाही, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मात्र त्यांनी रचलेले हे थर बंडखोरीचे आहेत आणि ते राज्यातील जनतेला मान्य नाहीत हे सांगायला शिंदे विसरले.
.