ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिंदेंच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरे गट संतापला, दिला थेट इशारा; म्हणाले, “किती तो निर्लज्जपणा…”

मुंबई | Thackeray Group : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) एका पोस्टवरून ठाकरे गट (Thackeray Group) चांगलाच संतापला आहे. राजस्थानमधील हवामहल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे बालमुकुंदाचार्य महाराज निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचं एक पोस्टर शिंद गटानं सोशल मीडियावर शेअर केलं होतं. या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा उल्लेख हिंदुह्रदयसम्राट असा करण्यात आला आहे. यावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.

या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा उल्लेख हिंदुह्रदयसम्राट करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटानं एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला असून त्यांना थेट इशारा दिला आहे. तर याबाबत ठाकरे गटानं ट्विट करत म्हटलं आहे की, “पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला… आता हेही? किती तो निर्लज्जपणा?”

“जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच…वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार!”, असा इशारा ठाकरे गटानं एकनाथ शिंदेंना दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये