इतरक्रीडाताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

सचिन तेंडुलकर नव्या मैदानावर; निवडणूक आयोगाने ‘या’ मोठ्या पदावर केली निवड

Sachin Tendulkar | निवडणूक आयोगानं नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची ‘नॅशनल आयकॉन’ (National Icon) म्हणून निवड करण्यात आली आहे. मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत अधिकाअधिक सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं हा मोठा निर्णय घेतला आहे.

आज (22 ऑगस्ट) निवडणूक आयोगानं याबाबतची घोषणा केली आहे. सचिन तेंडुलकर आणि निवडणूक आयोग यांच्याद्वारे बुधवारी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. हा करार तीन वर्षांचा असणार आहे. या कराराअंतर्गत सचिन तेंडुलकर मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे.

याबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी सचिन तेंडुकरच्या प्रभावाचा फायदा होईल आणि त्याचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल. युवकांमध्ये सचिन तेंडुलकरचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे नवीन मतदार मतदानासाठी पुढे येतील.

दरम्यान, निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेत मतदारांना सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रातील नामवंतांना ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून जाहीर करत असते. यामध्ये गतवर्षी अभिनेते पंकज त्रिपाठी यांची नॅशनल आयकॉन म्हणून निवड करण्यात आली होती. तर आता सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये