Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड, या’ तीन आमदारांची तटस्थ भूमिका!

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी  मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने आज विधानसभेसाठी निवडणुकीसाठी मतदान होत आहे. भाजप आणि शिंदे यांच्या गटाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी उभे होते. गेल्या दहा ते बारा दिवसानंतर बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाले आहेत.

अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांना 164 मते तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेचा व्हीप मोडत मतदान केलं आहे. मात्र त्या आमदारांची नाव रेकॉर्डवर घेण्यात आली आहेत. त्यासोबतच समाजवादी पार्टीचे अबु आझमी आणि रईस शेख आणि एका आमदाराने तटस्थ भूमिका घेतली. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी शिंदे-भाजप गटाल मतदान केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करत सभागृहात मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच भाषण केलं. यावेळी त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबतच्या भूमिकेबाबत भाष्य केलं. आतापर्यंतच्या सर्व विधानसभा अध्यक्षांनी लोकशाहीचा सन्मान वाढवला आहे. नार्वेकरांची सामाजिक जीवनातील व्याप्ती मोठी असल्याचं शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये