कर्मचार्यांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्य करावे

पिंपरी : कर्मचार्यांनी सेवानिवृत्तीनंतर सकारात्मक विचार करून आपले जीवन जगावे, आपले आरोग्य सांभाळून सामाजिक कार्य, पर्यटन अशाप्रकारचे आवडते छंद जोपासावेत, असे प्रतिपादन प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माहे जून २०२२ अखेर सेवानिवृत्त होणार्या अधिकारी, कर्मचार्यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त रविकिरण घोडके, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्या संध्या गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे आजी माजी पदाधिकारी नंदकुमार इंदलकर, उमेश बांदल, सुदाम वाघोले, शुभांगी चव्हाण, सुप्रिया सुरगुडे, अविनाश ढमाले यांच्यासह आज सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचार्यांचे नातेवाईक उपस्थित होते. माहे जून २०२२ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये शहर अभियंता संदेश चव्हाण, उपअभियंता प्रकाश सगर, असिस्टंट मेट्रन निर्मला गायकवाड, मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर, मुख्याध्यापिका जरीना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.