यम्मी फास्टफूडसाठी भुरळ घालणारा रुद्रा कॅफे

फास्टफूडने आजच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात भुरळ घातली आहे. कधीही पिझ्झा, बर्गर खायची तलफ आली की आजकालची तरुणाई एखाद्या प्रसिद्ध कॅफेत जाऊन त्या पदार्थांचा आस्वाद घेतच असते. मात्र आजकाल फक्त तरुणाईच नाही, तर लहान मुले, ज्येष्ठ लोकदेखील कॅफेत फास्टफूडचा आस्वाद घेताना दिसतात. त्यामुळे अशाच फास्टफूडप्रेमींसाठी रुद्रा कॅफे प्रसिद्ध आहे.
रुद्रा कॅफे ओंकार कुलकर्णी यांचे कॅफे आहे. या कॅफेने खवय्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. त्याचे कारण तिथल्या पदार्थांची चव आणि या कॅफेची आकर्षक मांडणी, रचना आणि त्यांनी केलेले खवय्यांचे आदरातिथ्य. यामुळे खवय्ये रुद्रा कॅफेत नेहमी येतात. रुद्रा कॅफेची व्हेज चीज बर्गर, चिकन बर्गर, फ्रेंच फ्राईज, व्हेज पिझ्झा, पनीर तंदूर पिझ्झा, डबल टॉपिंग पिझ्झा, चीज पिझ्झा, कोल्ड कॉफी असे अनेक स्वादिष्ट पदार्थ त्यांची खासियत आहेत. या कॅफेचा पिझ्झा चांगलाच प्रसिद्ध आहे. त्यामुळे या कॅफेत पिझ्झाप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात.
रुद्रा कॅफे हे तानाजीनगर, धनकवडी, पुणे या भागात आहे. या कॅफेत बसण्यासाठी प्रशस्त जागा, त्यांची आकर्षक रचना आणि स्वच्छ भाज्या वापरून येथील पदार्थ बनवले जातात. त्यामुळे येथे खवय्ये मोठ्या प्रमाणात येतात. तसेच या कॅफेत बर्थडे पार्टीचेदेखील आयोजन केले जाते. त्यामुळे तुम्हालादेखील चविष्ट फास्टफूडचा आस्वाद घ्यायचा असेल, बर्थडे सेलिब्रेशन करायचे असेल तर नक्की रुद्रा कॅफेला भेट द्या.