न्यू इंग्लिश स्कूल रमणबागचा अमृतमहोत्सव सांगता समारंभ
पुणे : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा पुन्हा राज्यात तिसरीपासून परीक्षा पुन्हा सुरु करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. राज्यात आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता पुन्हा तिसरीपासून परीक्षा सुरू केली जाणार आहे. तसेच याबाबत राज्यातील शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा सुरू असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षण संचालक महेश पालकर, संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, डॉ. स्वाती जोगळेकर, ॲड. अशोक पालांडे, मुख्याध्यापक सुनील शिवले आदी उपस्थित होते. आधुनिक भारत घडविण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे आणि त्या दृष्टीने पूरक शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे या वेळी दीपक केसरकर म्हणाले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केसरकर म्हणाले, योगसाधनेद्वारे स्मरणशक्ती वाढविण्यावर आणि मन एकाग्र करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. विद्यार्थ्यांसाठी व्यायामाचे महत्त्व लक्षात घेऊन शारीरिक शिक्षणासाठी सुविधा देण्यासोबत शालेय जीवनात योगाभ्यास आणण्याबाबत विचार करण्यात येत आहे.
आधुनिक तंत्रशिक्षणासोबत गायनासारख्या कलेचा अभ्यासही विद्यार्थ्यांना करता यावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.
आधुनिक भारत घडविण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे आणि त्या दृष्टीने पूरक शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे या वेळी केसरकर यांनी म्हणाले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केसरकर म्हणाले, योगसाधनेद्वारे स्मरणशक्ती वाढविण्यावर आणि मन एकाग्र करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. रमणबाग प्रशालेचे नामवंत माजी विद्यार्थी प्रमोद चौधरी, पद्मविभूषण डॉ. संचेती यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. मंत्री केसरकर यांच्या हस्ते प्रशालेच्या अमृतमहोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘अमृतकलश’ या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले आहे.