ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

वळसे पाटलांचा पवारांवरील ‘त्या’ वक्तव्याचा यू टर्न; म्हणाले…

मुंबई | Dilip Walse Patil – काल (20 ऑगस्ट) राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. आपण म्हणतो की शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत. पण राज्यात त्यांना कधीही एकहाती सत्ता आणता आली नाही, अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली होती. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता. अशातच आता वळसे पाटलांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझं संपूर्ण भाषण ऐका मी पवार साहेबांबाबत तसं काहीही बोललो नाही. आपल्या देशासाठी आणि राज्यासाठी पवार साहेबांनी 40 ते 50 वर्ष काम केलं आहे. तसंच आपल्या देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यातील काही पक्षांनी आपल्या हिमतीवर बहूमत मिळवून सत्तेवर ते बसले आहेत. पण आपल्या महाराष्ट्रातील जनतेनं अशी शक्ती पवार साहेबांसोबत उभी केली नाही, या गोष्टीची मला खंत आहे. तिच खंत मी व्यक्त करतो होतो.

मी शरद पवारांना कमी लेखण्याचा किंवा त्यांना काही चुकीचं बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण ते आमचे नेते आहेत आणि भविष्यातही तेच आमचे नेते राहतील, असंही दिलीप वळसे पाटलांनी सांंगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये