ताज्या बातम्यापिंपरी चिंचवडपुणे

रक्षाबंधननिमित्त सोमवारी पिएमपिएमएलच्या जादा बस धावणार

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, उपनगरे व ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिकांसाठी सोमवारी (दि.१९) “रक्षाबंधन” सणानिमित्त परिवहन महामंडळामार्फत जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दरवर्षी “रक्षाबंधन”चे दिवशी मोठ्या संख्येने प्रवासीवर्ग प्रवास करीत असतो. यास्तव दरवर्षी प्रमाणे परिवहन महामंडळाने “रक्षाबंधन”चे दिवशी प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या नियोजित १७६१ बसेस व्यतिरिक्त जादा ९१ बसेस अशा एकूण १८४३ बसेस महामंडळाकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. सदरील जादा बसेस ह्या गर्दीच्या पुढील मुख्य बस स्थानकांवरून सोडण्याचे नियोजन करणेत आले आहे. यामध्ये स्वारगेट, कात्रज, अप्पर डेपो, मार्केटयार्ड, पुणे मनपा भवन, कोथरूड डेपो, वारजे-माळवाडी, पुणे स्टेशन, वाघोली, हडपसर, भेकराईनगर, शेवाळेवाडी, सासवड, वाघोली, चिंचवड, निगडी, आळंदी, भोसरी, तळेगांव, राजगुरूनगर व देहूगांव या बसस्थानकांचा समावेश आहे.

“रक्षाबंधन” सणानिमित्त होणारी गर्दी विचारात घेता प्रवाशी सेवेसाठी परिवहन महामंडळाकडील वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच महत्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. “रक्षाबंधन” सोमवरी असल्यामुळे यावर्षी दिनांक १८,१९ व २० या दिवशी जादा बसेसचे नियोजन केलेले आहे. तसेच महामंडळाकडील अधिकारी, लिपीक व इतर कर्मचारी यांची महत्वाच्या स्थानकांवर व थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन व वाहतूक नियंत्रण करणेकामी नेमणूक करण्यात आली आहे.

तरी “रक्षाबंधन” सणानिमित्त नियोजन करण्यात आलेल्या जादा बससेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये