ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

सत्तार दुहेरी अडचणीत! गायरान जमीनीनंतर, TET घोटाळ्याचीही होणार SIT चौकशी फडणवीसांची घोषणा…

मुंबई : (Fadnavis announces SIT inquiry into TET scam) शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे 150 कोटींचे गायरान जमीन वाटप प्रकरण (Gayran land scam) आणि सिल्लोड कृषी महोत्सवासाठी (Sillod Agricultural Festival) 15 कोटी गोळा केलेली देणगी यावरुन हिवाळी अधिवेशनात (Winter sessions) विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील विरोधक या विषयांवर आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तसेच जोपर्यंत अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत हा विषय सोडणार नाही, असा पवित्रा देखील विरोधकांनी घेतला आहे. शेतकरी हैराण, सरकार खातंय गायरान, खोके लुटा, कधी गायरान लुटा, भूखंड घ्या, कोणी श्रीखंड घ्या, भूखंडाचे श्रीखंड खाणारे राजीनामी द्या, अशा प्रकारच्या अनेक घोषणांनी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं आहे.

अपात्र केलेल्या कंपन्यांना पात्र करून परीक्षा घेण्याची परवानगी दिली गेली असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. त्यामुळे प्रकरणाची SIT मार्फत उच्च स्तरीय चौकशी होणार असून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची फडणवीस यांनी विधान सभेत घोषणा केली.

सध्या विधानसभेत गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात (CET Scam) शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांची नाव चार महिन्यापूर्वी समोर आल्यानं खळबळ उडाली होती. अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आल्यानं एकच खळबळ उडाली होती. सत्तार यांच्या मुलींला 2017 पासून तर आजतागायात पगार मिळत असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे टीईटी घोटाळ्याची SIT चौकशी झाली तर, शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार दोहेरी अडचणीत येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये