ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“फडणवीसांनी केंद्रात जावं अन् शिंदेंना राज्यात ठेवावं”, शिरसाटांच्या वक्तव्यावर फडणवीस स्पष्टच बोलले…

मुंबई | Devendra Fadnavis – शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रात जावं अन् एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना राज्यात ठेवावं, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर आता शिरसाटांच्या या वक्तव्यावर स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना एशियन गेम्समध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन्स गेम्समध्ये भारतानं शंभरपेक्षा जास्त पदकं जिंकली आहेत. त्यामुळे फडणवीसांनी विजेत्या खेळाडूंचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलं.

तर राज्यात एकनाथ शिंदेंना ठेवावं अन् केंद्रात फडणवीसांनी जावं, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. मला संजय शिरसाटांच्या शुभेच्छा मान्य आहेत, असं म्हणत फडणवीसांनी या विषयाला पूर्णविराम लगावला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये