Top 5महाराष्ट्ररणधुमाळी

“मोदी-शहा नसते तर…”; मुख्यमंत्रिपदाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

नागपूर – महाविकास आघाडी सरकारला बरखास्त करत शिंदे-भाजप गटाचं यशस्वी सरकार स्थापन झालं आहे. सभागृहात या नवीन स्थापन झालेल्या सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या घरी परतले आहे. यावेळी नागपूरमध्ये फडणवीसांचं तर ठाण्यामध्ये शिंदेंचं जंगी स्वागत करण्यात आलं.

नागपूर विमानतळावरून देवेंद्र फडणवीस यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आपल्याशी बेईमानी झाली, पाठीत खंजीर खुपसला गेला. आपला मॅनडेट पळवला गेला, जनतेचा कौल पळवला गेला पण चोरी गेलेला कौल आम्ही परत पळवला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारमध्ये मी जाणार नाही अशी घोषणा केली होती मात्र राष्ट्रीय अध्यक्षांनी माझ्या नावाची घोषणा केली. जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलल्यानंतर मी सहभागी झालो. मोदी शहा नसते तर नागपूरचा मुख्यमंत्री झाला नसता. शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा असून त्यांनी जर आदेश दिला असता तर मी घरी बसायलाही तयार असल्याचं फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये