ठाकरे सरकारने घेतलेल्या औरंगाबाद नामांतराच्या निर्णयला फडणवीसांचा अवैधतेचा ठप्पा!

मुंबई : (Devendra Fadnavis Change Of Name Sambhajinagar) गुरुवार दि. ३० रोजी एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे. त्यातला महत्त्वाचा निर्णय म्हणजे औरंगाबाद नामांतराचा आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, हा निर्णय कायदेशीर वैध नाही, राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नाही.
बुधवारी दि. २९ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची बैठक बोलावली होती. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यासोबत आणखी आठ प्रस्तावाला सुद्धा मान्यता देण्यात आली आहे.
मात्र, या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय बेकायदेशीर असल्याचं फडणवीस म्हणाले आहे. जेव्हा राज्यपाल बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश देतात तेव्हा बहुमत सिद्ध झाल्याशिवाय मंत्रीमंडळाची बैठक घेता येत नसल्याच फडणवीस म्हणाले. त्यामुळे ते निर्णय आम्ही पुन्हा घेऊ असे फडणवीस म्हणाले.