प्रसिद्ध अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

मुंबई | Aditya Singh Rajput – प्रसिद्ध अभिनेता आणि माॅडेल आदित्य सिंह राजपूत (Aditya Singh Rajput) याचा मृत्यू झाला आहे. आज (22 मे) दुपारी आदित्य सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या अंधेरी येथील घरातील बाथरूममध्ये आढळला. आदित्यच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
आदित्यच्या मित्राला तो घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला. त्यानंतर त्याच्या मित्रानं आणि इमारतीच्या वाॅचमॅननं त्याला रूग्णालयात दाखल केलं. मात्र, रूग्णालयात आदित्यला मृत घोषित करण्यात आलं. तसंच आदित्यच्या मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आदित्य सिंह राजपूत हा प्रसिद्ध अभिनेता आणि माॅडेल होता. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असायचा. त्याचा चाहतावर्ग लाखोंच्या संख्येत होता. त्यानं ‘गंदी बात’ आणि ‘स्प्लिट्सविला’ या शोमध्ये काम केलं होतं. तसंच आदित्यच्या मृत्यूनं संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.