ताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

पुणे | Vikram Gokhale – मराठी तसंच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची तब्येत खालावल्याची बातमी समोर येत आहे. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे.

विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी पाच दिवसांपासून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, विक्रम गोखले यांनी अनेक मराठी आणि हिंदी सुपरहीट चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. हम दिल दे चुके सनम, भूलभुलैया, मिशन मंगल, अग्निपथ, दिलसे यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये विक्रम गोखले यांनी काम केलं आहे. नटरंगमधील त्यांचा नाना पाटेकर यांच्यासोबतच संवाद अजरामर संवाद म्हणून ओळखला जातो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये