क्राईमताज्या बातम्यादेश - विदेश

मोठी बातमी! मानव तस्करी प्रकरणी प्रसिध्द पंजाबी गायकाला दोन वर्षाची शिक्षा

दिल्ली- Panjabi Singer Arrested : पंजाबमधील अनेक गायक देशभर प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातही पंजाबी गायकांचे मोठ्या प्रमाणात फॅन आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून पंजाबी गायकांचा गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध येत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिध्द गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली होती. आज (१४ जुलै) अजून एका प्रसिध्द पंजाबी गायकाबाबत बातमी समोर आली आहे.

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांना एका प्रकरणात तब्बल दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर दिलेर यांना अटक करण्यात आली. मानव तस्करी प्रकरणात त्यांच्यावर २००३ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. पंधरा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाची आज पटीयाला कोर्टात सुनावणी झाली आहे.

मानव तस्करीच्या या प्रकरणात आणखी एक आरोपी बुलबुल मेहता यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर शमशेर सिंग आणि ध्यानसिंग या आरोपींचा मृत्यू झालेला आहे. गायक दिलेर परदेशात गायनाच्या कार्यक्रमांसाठी जात. तेव्हा कार्यक्रमाचा भाग म्हणून आपल्या सोबत काही लोकांनाही घेऊन जात. त्याबदल्यात परदेशातून त्यांना पैसे मिळत. या प्रकरणात सुरुवातला दिलेर यांच्या भावावर आरोप होते. मात्र, त्यानंतर दिलेर यांचाही समावेश असल्याचं समोर आलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये