ताज्या बातम्यारणधुमाळी

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं निधन

मुंबई | Siddhaanth Vir Surryavanshi – प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झालं आहे. तो 46 वर्षांचा होता. जिममध्ये व्यायाम करत असताना त्याचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धांतनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. कसौटी जिदंगी की, वारिस, सूर्यपुत्र कर्ण, कुसुम अशा अनेक मालिकांमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती.

जय भानुशालीनं (Jay Bhanushali) सोशल मीडियावर सिद्धांतचा एक फोटो शेअर करत त्याच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे. या फोटोवर जयने ‘तू खूप लवकर गेलास’, असं लिहिलं आहे. तर जय भानूशालीनं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ही माहिती त्याच्या जवळच्या मित्राकडून कळली असल्याचं सांगितलं आहे. तसंच सिद्धांतच्या जाण्यानं संपूर्ण टेलिव्हिजन विश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

jay bhanushali

दरम्यान, सिद्धांतनं ‘कुसुम’ या हिंदी मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानं आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच सिद्धांतनं कुष्णा अर्जुन, कसौटी जिंदगी की, क्या दिल मे है अशा मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या होत्या. तो मालिका विश्वामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये