मध्यरात्री ओटीटीवर ‘पठाण’ प्रदर्शित झाल्यानंतर डिलीट केलेले ‘हे’ सीन्स पाहून नेटकरी म्हणाले…
![मध्यरात्री ओटीटीवर 'पठाण' प्रदर्शित झाल्यानंतर डिलीट केलेले ‘हे’ सीन्स पाहून नेटकरी म्हणाले… rashtrasanchar news 2023 03 23T135756.613](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/rashtrasanchar-news-2023-03-23T135756.613-780x470.jpg)
Pathaan OTT Released : बॉलिवूड किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या 2 महिन्यांनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. त्याचा आजही प्रेक्षकांना क्रेझ आहे. इतकंच काय तर आजही लोक हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. चित्रपटगृहांमधून हा चित्रपट गेला नाही. पठाण हा चित्रपट मध्यरात्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजमध्ये काही डिलिट केलेले सीन्सही दिसणार असल्याची शक्यता वर्तवली होती. ती शक्यता खरी ठरली आहे.
‘पठाण’हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी त्यावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केल्या आहेत. चित्रपटात शाहरुख खानचा पहिलाच टॉर्चर करतानाचा सीन वाढवला असल्याचं नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. अनेकांनी तर हा सीन त्यांना चित्रपटगृहात पाहायला मिळाला नाही हे देखील सांगितले आहे. याबरोबरच शाहरुखच्या आणखी एका एन्ट्री सीनला या ओटीटी व्हर्जनमध्ये सामील करण्यात आलं आहे. हे सीन्स चित्रपटगृहात दाखवले असते तर प्रेक्षकांनी चित्रपटगृह आणखी डोक्यावर घेतलं असतं असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर दीपिकाचासुद्धा चौकशीचा एक सीन यामध्ये दाखवण्यात आला आहे.