ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

गडकरी भाषणाला उभे, अन् शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा; पोलिसांची शेतकऱ्यांना मारहाण, कार्यक्रमात गोंधळ!

हिंगोली : (farmers in Nitin Gadkari’s program) केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी शनिवार दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना यांच्या कार्यक्रमात काही शेतकऱ्यांनी तुफान राडा करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकापर्ण करण्यात झालं. याच कार्यक्रमात काही शेतकऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं आहे.

हिंगोलीत गडकरींच्या हस्ते दोन महामार्गाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी हा गोंधळ झाला. रामलीला मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असताना दोन शेतकरी उभे राहीले आणि त्यांनी घोषणा दिल्या. काही प्रश्न देखील ते यावेळी विचारत होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष या शेतकऱ्यांकडे गेले.

यावेळी कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांनी लगेच शेतकऱ्यांकडे धाव घेतली. पोलिसांनी शेतकऱ्याला उचलून बाहेर नेले. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात प्रशासनाने अन्याय केल्याची तक्रार या शेतकऱ्यांची होती. या दोघांनी निवेदन देण्याचे बोलून दाखवले. पण पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये