कन्नड औट्रम घाटात भीषण अपघात; 300 फूट दरीत कोसळली कार, 4 जणांचा मृत्यू
कन्नड | Accident News : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड औट्रम घाटात भीषण अपघात घडला. अक्कलकोटमधून देवदर्शन करून परतत असताना तवेरा कार 300 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अक्कलकोट येथीन देवदर्शन करून तवेरा कार मालेगाव येथे परतत होती. त्यावेळी पाऊस आणि धुके असल्यामुळे कारचालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. तसंच तेथील तुटलेल्या कठड्यामुळे कार 300 फूट दरीत कोसळली. त्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले.
या अपघातानंतर चार मृतदेह आणि सात जखमींना मोबाईल टॉर्चच्या उजेडात दोरखंड लावून वर काढण्यात आले. तर पावासामुळे अपघातस्थळी रस्त्यावर मोठे दगड, माती पडल्यामुळे तो रस्ता बंद झाला होता. त्यामुळे जखमींना रूग्णालयापर्यंत पोहचविण्यात अडथळे निर्माण झाले होते. तर पथकानं फावड्याने दगड, माती हटवत जखमींना रूग्णालयात दाखल केलं.
अपघातातील मृतांमध्ये शिलाबाई प्रकाश शिर्के (वय 60), प्रकाश गुलाबराव शिर्के (वय 65), पूर्वी गणेश देशमुख (वय 8) वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी (वय 35) यांचा समावेश आहे.