ताज्या बातम्यादेश - विदेश

मेक्सिकोमध्ये भीषण अपघात; 18 ठार, 29 जखमी

Mexico Accident | मेक्सिकोमध्ये (Mexico) व्हेनेझुएला (Venezuela) आणि हैतीमधून प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात दोन महिला आणि तीन लहान मुलांसह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ओक्साका आणि शेजारच्या प्यूब्ला राज्याला जोडणाऱ्या महामार्गावर पहाटे हा अपघात झाला.

या बस अपघात मेक्सिकोच्या शेजारील राज्य प्यूब्लाच्या सीमेजवळ असलेल्या टेपेलामेम शहरात घडला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बस अपघातात एकूण 29 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रीय इमीग्रेशन एजन्सीनं सांगितलं की, बसमध्ये 56 परदेशी नागरिक होते. तसेच, अपघातग्रस्तांमध्ये 55 विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये